1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:05 IST)

‘फी माफी सगळी द्या, संकट काळ समजून घ्या’, पालकांचे आंदोलन

‘Give fee waiver
पिंपरी – ”नफ्याचा वाटा कमी करा, आम्हाला फी माफी द्या”, ”फी माफी सगळी द्या, संकट काळ समजून घ्या”, ”कडेलोट केला विनंतीचा आता घटनांद फी माफीचा”, ”विनंतीला मान दिला नाही, फी माफिशिवाय थांबणार नाही” अशा जोरदार घोषणा देत एसपीएम पालक असोसिएशनने यमुनानगर येथील एसपीएम शाळेसमोर  फी माफीसाठी आंदोलन केले.
 
पालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुळिक, उपाध्यक्ष श्याम मोहिते यांच्यासह पालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षीच्या फी मध्ये सर्व पालकांना सरसकट 50 टक्के सवलत द्यावी. जोपर्यंत शाळा चालू होत नाही. ऑनलाईन वर्ग होत आहेत. तोपर्यंत शालेय फी 50 टक्के भरण्याची मुभा द्यावी. चालू शैक्षणिक वर्षामधील फी वाढ रद्द झाली पाहिजे. शाळा चालू झाल्यानंतर मुलांच्या सुरक्षेत वाढ करावी. शाळा चालू झाल्यानंतर खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करावे. सर्व प्रकारचे मैदानी खेळ सुरु करावेत.
 
शाळेतील पाण्याचा प्रश्न सोडवावा. स्वच्छता ठेवावी. शाळा चालू झाल्यानंतर कमीत कमी 2 पालक सभा वर्षभरात घ्यावात, अशी मागणी पालक असोसिएशनने केली. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.