रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:07 IST)

शिक्षकी पेशाला काळीमा, शिक्षकाकडून विद्यार्थिनीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी

पुण्यात एका शिक्षकानं विद्यार्थ्यासोबत अश्लिल भाषेत संवाद साधल्यानं काळं फासल्याची घटना समोर आली आहे. अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीशी अश्लील भाषेत हा शिक्षक संवाद साधत होता. त्यामुळे त्याच्या तोंडाला काळ फासण्यात आलं. बारावीला मार्क वाढवून देतो आणि पैसे देतो. फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं या शिक्षकाने विद्यार्थीला सांगितलं.

शिक्षकाकडून विद्यार्थिनीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली. याची माहिती संतप्त पालकांना कळताच त्यांनी शिक्षकाच्या तोंडाला काळं फासलं आहे. संतापलेल्या पालकांनी शिक्षकाच्या तोंडाला काळी शाई फासून ओढत पोलीस स्टेशनमध्ये नेलं.