शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (08:37 IST)

'स्पर्श' च्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ३४ लाखांचे मानधन अदा

पिंपरी -चिंचवड ऑटो क्लस्टर येथील कोरोना केअर सेंटर चालवायला दिलेल्या स्पर्श हॉस्पीटलचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग आढळून आल्यानंतर त्यांचा ठेका काढून घेण्यात आला. मात्र, त्यांचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली. कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी होऊ लागल्याने ऑटो क्लस्टर कोरोना सेंटर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सेवा अधिग्रहित केलेल्या स्पर्श हॉस्पीटलच्या १८२ अधिकारी कर्मचाऱ्यांना २२ दिवसांच्या वेतनापोटी ३४ लाख रूपये मानधन देण्यात येणार आहे.
 
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. काही कोरोना केअर सेंटर खासगी रूग्णालय, एनजीओ विंâवा खासगी संस्था यांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला. चिंचवड – ऑटो क्लस्टर येथील कोरोना केअर सेंटर स्पर्श हॉस्पीटल यांना चालविण्यास देण्यात आले.

स्पर्श हॉस्पीटल मार्पâत २८ ऑगस्ट २०२० पासून ऑटो क्लस्टर येथील कोरोना केअर सेंटर चालविले जात होते. मात्र, व्हेंटीलेटर बेड उपलब्ध करून देण्यासाठी पैसे मागणे, रेमडेसिवर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणे अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्यांमध्ये स्पर्श हॉस्पीटलचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. तसेच त्यांच्यावर पर्यवेक्षण करणाऱ्या व्यवस्थापनाचे अपयश निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त राजेश देशमुख यांनी ९ मे २०२१ रोजी स्पर्श हॉस्पीटल चालवित असलेले ऑटोक्लस्टर कोरोना रूग्णालय तात्काळ अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला. स्पर्शचा ठेका काढून घेण्यात आला. तसेच रूग्णालयात सेवा देत असलेले स्पर्श हॉस्पीटलचे तसेच इतर संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडीकल स्टाफ आणि इतर कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या.
 
या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेने रूग्णालय अधिग्रहित केलेल्या कालावधीतील नियमानुसार देय असलेले वेतन भत्ते महापालिकेमार्पâत देण्यात येतील, असे आदेशात नमुद केले. कर्मचाऱ्यांचे हजेरी अहवाल आणि इतर कागदपत्रे ऑटो क्लस्टर रूग्णालयाचे नोडल अधिकारी यांनी २० मे रोजी सादर केली आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडीकल स्टाफ आणि इतर कर्मचारी अशा १८२ जणांचा समावेश आहे. त्यानुसार किमान वेतन दरानुसार १० मे ते ३१ मे २०२१ या कालावधीसाठी ३४ लाख ६ हजार रूपये मानधन देण्यात येणार आहे.