गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (16:44 IST)

जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

leopard
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलगा सकाळी शेतात शौचास गेला असता बिब्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला फरफटत उसाच्या शेतात नेले.

रुपेश असे या मुलाचे नाव आहे. त्याचे आईवडील वीटभट्टीवर काम करतात.अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून आठ दिवसांपूर्वी तो येथे आला होता.

वन विभाग अधिकाऱ्यांनी ही माहिती  देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले त्यांना शोध घेत असता रुपेशचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला त्याच्या अंगावर जखमा होत्या. 

या परिसरात काल रात्रीपासून डीपी जळाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होताच. घराच्या मागेच उसाचे शेत असून पहाटे रुपेश शौच करण्यास गेला असता ही घटना घडली. 
 
गेल्या काही काळापासून देशभरात लांडगा, बिबट्या आणि कोल्हे यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे सरकारही चिंतेत असून वनविभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे.
Edited By - Priya Dixit