1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (15:50 IST)

कागदाचे मोठे रिळ कारवर पडले, एकाचा मृत्यू; घाटात वाहतूककोंडी

A large reel of paper fell on the car
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर  झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडून हा अपघात झाला आहे. हा अपघात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर  खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळ झाला असून अपघातामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ एका ट्रेलमधील कागदांचे मोठे रिळ कारवर पडले.या भीषण अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला.
 
कंटेनरमधील कागदाचे मोठे रिळ महामार्गावर पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगालागल्या आहेत.या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.अपघातात मृत्यू  झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही.अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस,बोरघाट पोलीस ,आयआरबी (IRB) घटनास्थळी दाखल झाले आहे.अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्यात येत आहेत. तसेच महामार्गावर कागदाचे मोठे रिळ पडले असून ते बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.