गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (16:27 IST)

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला

पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच सहकारनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
कल्पना घोष (वय 32)असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहकारनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मूळच्या बंगालच्या असलेल्या कल्पना धनकवडी परिसरातील फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनांस्थळी धाव घेतली. त्यावेळी कल्पना या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.