1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (20:20 IST)

दोन मुलींकडून एका जेष्ठ महिलेला निर्दयीपणे मारहाण

crime
पुण्याच्या शिक्रापुर परिसरात दोन मुलींनी जेष्ठ महिलेला मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या दोन मुलींसोबत त्यांची आई देखील साथ देताना व्हिडिओत दिसतेय.याबाबत शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तसेच या मुलींच्य़ावर कठोर कारवाई करण्याची केलीय.
 
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या शिक्रापूर गावातील ही घटना आहे.दोन मुलींनी निर्दयीपणे मारहाण केलीय.हे दोन्ही कुटुंब शेजारी राहतात. शेजारची भांडण आहेत. मात्र कोणत्या कारणावरून वाद झालाय हे समोर आलं नाही. मात्र यांच्यावर कारवाई व्हावी याची मागणी नेटकरी करत आहेत.