मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2024 (16:52 IST)

पुण्यातील इंजिनिअरींग कॉलेजच्या वसतिगृहात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

death
पुण्यातील येवलेवाडीच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिषेक प्रवीण शेळके(22)  असे या मयत तरुणाचे नाव असून तो शिर्डी अहमदनगरचा राहणारा होता. तो पुण्यात शिक्षणासाठी आला असून अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला होता. मंगळवारी तो वसतिगृहात एकटाच असून संध्याकाळी त्याचे मित्र खोलीवर आल्यावर दार ठोठावल्यावर तो गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना देण्यात आली असून ते तातडीनं  घटनास्थळी पोहोचले. अभिषेक ने असे टोकाचे पाऊल  का घेतले अजून ते कळू शकले नाही. मात्र त्याला काही पेपर अवघड गेल्याचे पोलिसांनी सांगितले.कोंढवा  पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit