1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (12:03 IST)

मुलीला कुत्रा चावला, आईने पिल्लांचा घेतला जीव

पुणे- एक धक्कादायक घटनेत एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारण्यात आले आहे. तिच्या मुलीला कुत्रा चावला होता या रागातून महिलेने हे कृत्य केले.
 
ही घटना हडपसर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत परिसरात घडली आहे. अनिता दिलीप खाटपे (वय 45) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अनिता खाटपे या पुण्यातील हडपसर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहतात. त्यांच्या मुलीला कुत्रा चावल्याने त्या खूप रागात होत्या आणि याच रागातून त्यांनी कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना इतके बदडले की त्यांचा मृत्यू झाला. 
 
तसेच सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत ही महिला सोसायटीत काठी घेऊन फिरत होती. याप्रकरणी नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली आहे. या महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.