चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वस्तूंचा पुणे पोलिसांकडून लिलाव
पुण्यामध्ये चोरीच्या घटना दररोज घडत असतात. यापैकी काही गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश येते. परंतु काही चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या वस्तूंच्या मुळ मालकाचा शोध लागत नाही.त्यामुळे अशा वस्तू पुणे पोलिसांकडे (Pune Police) वर्षानुवर्षे पडून आहेत. मागील अनेक वर्षापासून पडून असलेल्या कारटेप, मोबाईल, कपडे, टेप रेकॉर्डर, वॉच, जुने लॅपटॉप अशा वस्तूंचा लिलाव (Auction) लष्कर पोलिसांकडून (lashkar police, Pune) करण्यात येणार आहे.
मंगळवारी (दि. 17) लष्कर पोलीस ठाण्यात (lashkar police station) सकाळी 11 वाजता या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.
लष्कर पोलीस ठाण्यात मागील अनेक वर्षापासून चोरीच्या (theft) गुन्ह्यातील मुद्देमाल पडून आहे.या वस्तूंचा लिलाव करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यात आली.न्यायालयाच्या परवानगी उद्या (मंगळवार) अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात आहे.
लष्कर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.यातील काही जणांचा शोध लागला आहे. मात्र, जप्त केलेल्या काही वस्तू मागील अनेक वर्षापासून पडून आहेत.या वस्तूंवर कोणीही हक्क सांगितलेला नाही.तसेच पोलिसांना देखील वस्तूंच्या मूळ मालकांचा शोध लागलेला नाही.त्यामुळे पोलिसांकडून लिलाव करण्यात येणार आहे.ही लिलाव प्रक्रिया लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारात सकाळी 11 वाजता होणार आहे.