शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:21 IST)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निगडीत उभारले कोरोना विलगीकरण केंद्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती व स्व. तात्या बापट स्मृती समिती कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यांच्या वतीने निगडी येथील एस.पी.एम. शाळेत कोरोना विलागिकरण केंद्र  सुरू करण्यात आले आहे.
 
कोरोना विलगीकरण केंद्रात 50 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये विलगीकरण यासोबतच आवश्यक त्या सुविधा राहणार आहेत. या केंद्रात परिसरातील गृहविलगिकरण सांगितलेल्या रुग्णांची सोय होणार आहे.
 
विलगीकरण केंद्र उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, कार्यवाह महेश्वर मराठे, प्रांत तरुण व्यवसायी प्रमुख संदीप जाधव, धर्म जागरण विभागाचे हेमंत हरहरे, जनकल्याण समितीचे कार्यवाह उदय कुलकर्णी, तात्या बापट स्मृती समितीचे रमेश करपे, देहू गट संघचालक नरेश गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
 
शहरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना संघाचे स्वयंसेवक गरजूंना मोफत धान्य किट, अन्नाची पाकिटे, ठिकठिकाणी काढा वाटप, लघु उद्योग भारतीच्या मदतीने स्वयंरोजगार, उद्योग रोजगार सहाय्य अशा विविध सेवाकार्यातून राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले होते. तसेच, कोरोना विलगीकरण केंद्र, प्लास्मा दान अभियान, लसीकरण जनजागृती अशी कामे संघ कार्यकर्ते काम करत आहेत.