सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (08:47 IST)

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत ‘आप’ची एन्ट्री

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात आता ‘आम आदमी पार्टी’ही उतरली आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. आपचे प्रभारी गोपाळ इटालिया पुण्यात आहेत. त्यांनी कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी 9 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
 
या दोन्ही पोटनिवडणुकांसंदर्भात गोपाळ इटालिया पुण्यातील आपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करत आहेत. लवकरच पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होणार आहे. वास्तविक आपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येते.
Edited by : Ratnadeep Ranshoor