1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (16:04 IST)

पुणे हादरले, शिवसेना दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून

ex shivsena corporator
पुण्यातील बुधवार पेठ भागातील शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. दिपक मारटकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिपक हा युवा सेनेचा पदाधिकारी देखील होता. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा दिपक त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत कार्यालयाबाहेर उभा असताना त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. शुक्रवार पेठेतील गवळी आळी येथे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिपक आणि त्याचे काही सहकारी कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांनी दिपकवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. काही कळण्याच्या आतच दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
 
जखमी अवस्थेतच दिपकला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा हल्ला का करण्यात आला यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.