1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (08:10 IST)

पैसे कमावण्यासाठी शार्टकट, थेट युट्युबवर व्हिडिओ पाहून चक्क बनावट नोटा छापल्या

पिंपरी-चिंचवडमध्ये झटपट पैसे कमावण्याच्या हेतूने बहिण-भावाने युट्युबवर व्हिडिओ पाहून चक्क बनावट नोटा छापल्या आहेत. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या ३४ बनावट नोटा, प्रिंटर, कागदी रिम असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, सुनीता प्रदीप रॉय (वय २२) आणि दत्ता प्रदीप रॉय (वय १८) दोघेही रा. घोटावडे फाटा, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या बहिण-भावाची नावे आहेत. पुण्यातील उत्तम नगर परिसरात सुनीता आणि दत्ता राहण्यास असून हे दोघेजण घरातच एका खोलीत शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापत असतं. 
 
सुरुवातीला त्यांनी शेकडो नोटा छापल्या मात्र त्या व्यवस्थित छापल्या न गेल्याने त्यांनी युट्युबवरील बनावट नोटांचा व्हिडिओ पाहून पुन्हा प्रयत्न केला. यावेळी १०० रुपयांच्या ३४ नोटा छापल्या. भोसरी येथील गव्हाणे वस्तीमधील भाजी मंडईत त्यांनी या नोटा वापरल्या. मात्र, नेहमीपेक्षा नोट वेगळी वाटत असल्याने भाजीविक्रेत्याला याचा संशय आला. तेथील काही महिलांनी तिला पकडून चोप दिला. दरम्यान, बनावट नोटा छापत असल्याची कबुली दोघांनी दिली आहे.