1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:44 IST)

अखेर शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात आयोजित झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
३० जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार, एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी याला भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक विधाने केली होती. शरजिल उस्मानी याने एल्गार परिषदेत ''हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरिके से सड़ चुका है'' आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ''मी भारतीय संघराज्य मानत नाही'', अशी प्रक्षोभक विधाने केली होती. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला होता.नुकत्याच पुण्यात आयोजित झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.