शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (19:22 IST)

उरवडे येथील रासायनिक कंपनीत अग्निकांड 17 कामगार बेपत्ता 8 मृतदेह सापडले

पुण्याच्या पिरंगुट एमआयडीसी भागातील उरवडे येथील एका सेनेटाईझर उत्पादक कारखान्यात सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कारखान्यात अडकलेल्या 37 पैकी 8 महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. अद्याप बरेच कर्मचारी बेपत्ता आहेत. कारखान्यातून निघणारा गडद काळा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरत आहे. सध्या अनेक कामगार कारखान्यात अडकले आहेत.
 
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि दोन डझनहून अधिक अग्निशमन दलाचे जवान त्यांचे बचावकार्य करत आहेत. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते, ज्यामुळे आग  खूप वेगाने पसरत आहे.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किट हे एक मोठे कारण असू शकते असा विश्वास आहे. मुळशी तहसीलदार अभय यांनी सांगितले की, तीन फायर टेंडरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सध्या आगीवर नियंत्रण मिळवून कुलींगचे काम सुरु आहे.