सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (08:59 IST)

अश्लील भाषेत व्हीडिओ करणाऱ्या मुलीला पुण्यात अटक

इन्स्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणींना पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी अटक केली आहे.
थेरगाव क्वीन या नावाने हे अकाऊंट होतं. मित्रमैत्रिणींसह अश्लील भाषेतील धमकीचे व्हीडिओ पोस्ट केल्याने तीनजणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली.
माहिती तंत्रज्ञान तसंच अन्य कलमांअंतर्गत या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.