शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (15:51 IST)

खुशखबर ! फक्त दहा रुपयांत ‘एसी’ बसने प्रवास, पुणे पालिकेची ‘पुण्यदशम’ योजना

पुणे महापालिकेने फक्त दहा रुपयांत दिवसभरासाठी ‘एसी’ बस प्रवास योजना आणली आहे. या योजनेला ‘पुण्यदशम’ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात दोन जुलैपासून आकर्षक गुलाबी रंगसंगतीच्या पन्नास मीडी बसेस पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि पेठांमध्ये प्रवासासाठी देण्यात येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये 300 आणखी बस उपलब्ध केल्या जाणार आहेत.
 
या योजनेला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या योजनेंतर्गत दिवसभरामध्ये दहा रुपयात वातानुकुलीत बसमधून कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. सीएनजीवर चालणा-या या मिडी बसची आसन क्षमता 24 आहे.छोटी बस असल्याने मध्यवस्तीतील लहान रस्त्यांवरुनही ही बस धावू शकणार आहे. महापालिकेच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना मांडण्यात आली होती.
 
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. शनिवारी (दि. 09) दुपारी एक वाजता आर्यन पार्किंग, महात्मा फुले मंडई या ठिकाणी  उद्घाटन होणार आहे.