सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (08:03 IST)

पुण्यातील 6 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या,'विश्रामबाग’ आणि ‘अलंकार’च्या वरिष्ठ PI पदी ‘या’ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात 6 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.विश्रामबाग आणि अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदीअधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षकांची नावे आणि कोठून कोठे बदली किंवा नियुक्ती झालीत्याबाबत पुढीलप्रमाणे विजय शंकर टिकोळे (व.पो.नि. विश्रामबाग पोलीस स्टेशन ते विशेष शाखा)सुनील बाबुराव माने( विशेष शाखा ते व.पो.नि. विश्रामबाग पोलीस स्टेशन) प्रतिभा संजीव जोशी (वाहतूक शाखा ते व.पो.नि. अलंकार पोलीस स्टेशन)फेहमीदा नूरखान बकाईत (अजप्रतस, पुणे ते नियंत्रण कक्ष)संतोष दगडू सोनवणे (रा गु वि ते वाहतूक शाखा),विजयकुमार तात्याराव पाटील ( रा गु वि ते पोलीस निरीक्षक (गुन्हे) मुंढवा पोलीस स्टेशन)सदरील आदेश हे अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने काढले आहेत.