रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (16:56 IST)

परदेशवारीही केली नाही तरी झाला कोरोना

पुण्यातील एका महिलेला करोनाची लागण झाली असून त्यांनी परदेशवारीही केली नसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, त्यांनी एका लग्न समारंभात उपस्थिती लावली होती. त्यानंतरच त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
 
पुण्यातील ४२ वर्षीय महिला एका लग्नासाठी गेली होती. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने, एका खासगी रुग्णालयात करण्यात आलं. त्याठिकाणी त्यांची तपासणी केली असता त्यांना करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. सध्या त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सुरुवातीला त्यांची स्वाइन फ्लू आजाराची तपासणी करण्यात आली. मात्र, पुढील तपासणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.