सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मार्च 2023 (09:19 IST)

Maharashtra Clashes: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी, दगडफेकीनंतर पोलिसांच्या गाड्या जाळल्या

A clash broke out
ANI
Maharashtra Clashes: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. बचावासाठी पोहोचलेल्या पोलिसांच्या वाहनांना हल्लेखोरांनी आग लावली.
 
छत्रपती संभाजीनगरचे सीपी निखिल गुप्ता म्हणाले की, पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली, काही खासगी आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आता परिस्थिती शांत आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करतील.
 
या महिन्याच्या सुरुवातीला पिंपरी चिंचवड शहरात एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
 
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दोन गटांमध्ये हाणामारी होण्याची शक्यता होती, त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अटलबिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापूर्वी ही घटना घडली.
Edited by : Smita Joshi