गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (16:38 IST)

महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभव कदम यांची आत्महत्या

महाराष्ट्र : महाराष्ट्र पोलीस दलातील हवालदार वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. वैभव कदम यांचा मृतदेह निलजे ते तळोजा स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर आढळून आला. रेल्वे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. इंजिनियर अनंत करमुसे मारहाण प्रकरणी माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत पोलीस हवालदार कदम  हे तैनात होते. अनंत करमुसे प्रकरणाबाबत वैभवचीही चौकशी करण्यात येत होती. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.