मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (15:09 IST)

अचलपूर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, भाजपा शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक

arrest
अचलपूर येथील दोन गटात झालेल्या हिंसाचारा (violence)प्रकरणी मोठी माहिती मिळाली आहे.अचलपूर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, भाजपा शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक अचलपूर  येथील दोन गटात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी मोठी माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप शहराध्यक्ष अभय माथने  याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.
 
अचलपूर प्रकरणात आतापर्यंत 24 आरोपींना अटक करण्यात आली असून अभय माथने याने झेंडा लावला असल्याचं बोललं जात त्यानंतर हा वाद झाला.
 
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी अचलपूर परतवाडा या दोन्ही शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे.