रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (15:47 IST)

जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याची आवश्यकता नाही – आयुक्त पाटील

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये बेडची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे तूर्त जम्बो कोविड केअर सेंटर चालू करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिका पिंपरी-चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
 
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गेल्या अकरा महिन्यांत करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. परंतु, अचानक फेब्रुवारी 2021 मध्ये शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होवू लागली.
 
दिवसाला 800 च्या पटीत नवीन रुग्ण सापडू लागले. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होतच आहे. रुग्णवाढ थांबत नाही. आता वाढत असलेल्या अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. अनेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेक रुग्ण होम आयसोलेशनला पसंती देत आहेत.
 
दरम्यान, महापालिकेकडे बेडची उपलब्धता पुरेशी आहे. 15 हजार खाटा आहेत. त्यामुळे तूर्त जम्बो कोविड केअर सेंटर चालू करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.