रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (09:18 IST)

ऑनलाईन क्लास, अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील मजकूर पाठवणारा शिक्षकाला अटक

ऑनलाईन क्लासमध्ये 10 वर्षीय विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स पाठवणाऱ्या शिक्षकाला मुंबईतील सांताक्रुझ पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना प्रकार 6-7 सप्टेंबर रोजी ऑनलाईन क्लास सुरु असताना शिक्षकाने विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स पाठवले होते. शिक्षकाने रविवारी 3 स्टिकर्स पाठवले होते. मात्र थोड्या वेळाने ते डिलिट केले. व त्यानंतर सोमवारी देखील शिक्षकाने एक अश्लील स्टिकर पाठवला. विद्यार्थीनीने ही बाब आपल्या पालकांच्या ध्यानात आणून दिली. त्यानंतर पालकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
 
दरम्यान, आरोपीवर भारतीय दंड संहिता अंतर्गत विनयभंग करण्याचा, आयटी अॅक्ट (IT Act) आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी शिक्षकांनी विद्यार्थींनीवर बलात्कार, विनयभंग केलेल्या अनेक घटना देशातील विविध भागातून समोर आल्या आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणातही असे प्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे.