शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (22:17 IST)

पुण्यात वर्तमानपत्र वितरणाला सशर्त परवानगी

शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता वर्तमानपत्र वितरणालाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे.
 
करोना विषाणूने जगभरात थैमान घातला आहे याचा फटका बाजाराला झाला असून वर्तमानपत्राला देखील बसला. वर्तमानपत्र हातळल्याने करोनाची लागण होण्याची भीतीने चर्चेला सुरुवात झाल्यानंतर वितरण संघटनेकडून वर्तमानपत्र वाटप न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयामुळे मागील ४० दिवसांपासून वर्तमानपत्रांचे वितरण बंद होते. यादरम्यान आठवडाभर वितरण पुन्हा सुरु करण्यात आले होते मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर बंदी घातल्याने ते पुन्हा थांबवण्यात आले होते.
 
आता वितरणाला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, सकाळी ७ ते १० या काळात घरोघरी जाऊन वर्तमानपत्रांचे वितरण करावे. वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्क घालावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असा आदेश काढण्यात आला आहे.