शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (10:59 IST)

पुण्यात पोस्टरबाजी, सोशल मीडियात भन्नाट चर्चांना उधाण

पुण्यातील हडपसर भागासह अनेक ठिकाणी ‘हॅप्पी एनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’ असं लिहिलेले पोस्टर बघायला मिळत आहेत. आपल्या नाराज झालेल्या पत्नीला मनवण्यासाठी एका डॉक्टरने हे फ्लेक्स लावल्याची चर्चा सुरु आहे. दोघेही पती-पत्नी डॉक्टर असून त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात सुरु आहे.
 
याआधी सोशल मीडियावर पुण्यातील रस्त्यांवर लागलेले “सविताभाभी, तू इथंच थांब….” असा मजकूर असणारे पोस्टर व्हायरल होत होते. पुन्हा वेगळ्या प्रकारे आपल्या पत्नीला मनवण्यासाठी आणि घटस्फोट रोखण्यासाठी म्हणून पोस्टरबाजी झाली आहे. ही पोस्टरबाजी उच्चशिक्षित पतीने पत्नीचं मन वळवण्यासाठी केली. यासाठी त्याने जाहिरपणे ‘सॉरी आप्पू, हॅपी एनिव्हर्सरी, आय लव्ह यू’ म्हणत माफी मागितली.
 
पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमी असलेल्या या पोस्टरवर इतर काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे हे पोस्टर कोणी आणि का लावले असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  हा  प्रसिद्धीचा प्रकार असू शकतो, असं मत काहीजण व्यक्त करत आहेत. मात्र यामुळे   सोशल मीडियात मात्र भन्नाट चर्चांना उधाण आलं आहे.