सोमवार, 15 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (16:20 IST)

अबब, पुण्यात अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळले

pune animal
पुण्यामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोच्या मार्गाचे खोदकाम सुरु आहे. याच खोदकामादरम्यान मंडई परिसरामध्ये अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळून आले आहे. हे अवशेष किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे असावेत असा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. 
 
सापडलेल्या हाडांचा आकार सामान्य प्राण्यांच्या सांगाड्यातील हाडांपेक्षा मोठा आहे. प्रथम दर्शनी ही हाडं हत्तीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी ही हाडं सापडली त्या खोदकामाच्या ठिकाणाला पुरातत्व खात्यामधील जाणकार आणि इतिहास संशोधकांनी भेट दिली आहे. या हाडांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यांचे रहस्य उलगडण्यास मदत होईल असं सांगितलं जातं आहे.