संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितले उद्या धमाका होणार

sanjay raut
Last Modified गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (15:41 IST)
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती होणार असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. याचा प्रोमो त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. घेण्यात आलेली मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी प्रोमो शेअर करते वेळेस उद्या धमाका होणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी केली असल्याचे पाहयला मिळत आहे. संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल अशी अनेक ज्योतिष आणि भाकिते वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली. यासंबंधी उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेले दिसत असून असे बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. “सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.
“आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतल्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो,” असा इशाराही उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

राज ठाकरे पुन्हा दिसले विना मास्क

राज ठाकरे पुन्हा दिसले विना मास्क
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा ...

पुणे मेट्रोला वेगवेगळ्या पातळ्यांवर तीन आयएसओ मानांकन

पुणे मेट्रोला वेगवेगळ्या पातळ्यांवर तीन आयएसओ मानांकन
पुणे शहरात पीसीएमसी ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये मेट्रो रेल ...

सर्व पुरावे अमित शहांना देणार : फडणवीस

सर्व पुरावे अमित शहांना देणार : फडणवीस
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीने आता गंभीर वळण घेतले आहे.

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच जायला ...

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही : फडणवीस

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही : फडणवीस
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह ...