बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (16:47 IST)

अमृता फडणवीस यांच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनासोबत #WorldToiletDay2020 निमित्त भन्नाट ट्वीट

मुंबई- 19 नोव्हेंबर रोजी International Mens Day बरोबर World Toilet Day दिनही साजरा केला जातो. या निमित्तानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भन्नाट ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
शिवसेनेवर टीका करण्याची संधी न सोडणार्‍या अमृता यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
 
अमृता फडणवीस यांनी एक सर्वसामान्य स्त्री म्हणून देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही 'नॉटी' पुरूषांच्या आचार विचारांची घाण 'फ्लश' करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी. 
 
अमृता यांनी या ट्वीटमध्ये शुभेच्छा देत थेट संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.