सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (14:13 IST)

Pune: बिबट्या दबक्या पावलांनी आला आणि कुत्र्याचा शिकार केला

leopard
पुण्यात भर लोकवस्तीत एका बिबट्यानं कुत्र्याचा शिकार केल्याची घटना घडली आहे. रखवालदार म्हणून बसलेला कुत्रा कधी शिकार झाला हे त्याचा समजले नाही. या घटनेमुळे वस्तीतील लोकांचा थरकाप उडाला आहे. 
नगर कल्याण महामार्गावर आळेफाटा येथे एका गेरेजवर एका कुत्र्याला रखवालदार म्हणून बसवले होते. शेजारी गेरेजचे मालक सुधाकर शर्मा झोपलेले होते. 

तेवढ्यात एक बिबट्या दबक्या पावलांनी आला आणि बसलेला कुत्र्याची मान धरून घेऊन गेला. या वेळी मालकाने सर्व थरार स्वतःचा डोळ्याने बघितला कुत्र्याची शिकार करून बिबट्या निघून गेला. 
 
या लोकवस्तीत बिबट्या आल्याने दहशत पसरली आहे. या बिबट्याला वनविभागाकडून पकडण्याची मागणी केली जात आहे. हा बिबट्या दररोज कुत्र्यांचा शिकार करत असल्याचे नागरिक म्हणाले. कुत्र्याच्या शिकारी नंतर बिबट्याला रेबिजचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे
 
 
Edited by - Priya Dixit