सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (19:38 IST)

पुणे पोलीस गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची चौकशी करणार

pune police
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याकांडात महाराष्ट्रातील दोन शूटर्सअसल्याचे समोर आले आहे.  हे दोन्हीही शूटर्स हे पुणे जिल्ह्यातील आहे. त्यातील एकाचे नाव सौरव महाकाळ असे असून, त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा मारेकरी संतोष जाधव हा अद्यापही फरार आहे. या संतोष जाधवच्या शोधासाठी आता पुणे पोलीस, तिहार जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिष्णोई याची चौकशी करणार आहेत. एका खूनाच्या प्रकरणात फरार असलेला संतोष हा पंजाब, हरियाणा परिसरात असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडे होती. आता सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात त्याचे नाव आल्याने, संतोष जाधव सध्या लॉरेन्स बिष्णोईच्या गँगमध्ये सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.
 
संतोष जाधव हा सिद्धू प्रकरणातील एक मारेकरी आहे. तो मुळचा पुण्यातील मंचरचा रहिवासी आहे. मंचरच्या ओंकार उर्फ राण्या बाणखेले याच्या हत्येनंतर, तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संतोष जाधव हा 23 वर्षांचा आहे आणि त्याची आई मंचरलाच राहते. तर त्याची पत्नी कोल्हापूरला राहात असल्याची माहिती आहे. संतोष जाधवच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच लूकआऊट नोटीस बजावली आहे. तो पंजाब, हरियाणा परिसरात असल्याची माहितीही पोलिसांना होती. आता सिद्धू हत्येप्रकरणात त्याचे नाव आल्याने आता गँगस्टर लॉरेन्सचीच चौकशी करण्यात येणार आहे.