गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 23 जुलै 2024 (12:02 IST)

प्रेमप्रकरणातून दोन मुलांची आई गरोदर राहिली, गर्भपातामुळे मृत्यू, प्रियकराने मृतदेह जिवंत मुलांसह नदीत फेकले

crime
पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रसंगातून गर्भवती झालेल्या 2 मुलांच्या आईच्या मृत्यू झाल्यावर तिचे मृतदेह इंद्रायणी नदीत फेकताना महिलेचे दोन्ही मुले रडू लागले तर प्रियकराने मुलांना नदीत फेकले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. 

सदर प्रकरण 9 जुलै रोजीचे आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. महिलेचे आरोपीशी प्रेम संबंध होते. त्यातून ती गर्भवती झाली. महिलेच्या प्रियकराचा मित्र महिलेचा गर्भपात करवण्यासाठी ठाणे येथे रुग्णालयात घेऊन गेला.तिथे महिलेचा मृत्यू झाला. 

महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही मुलांना प्रियकराच्या मित्राने 9 जुलै रोजी तळेगावच्या वराळे येथे आणले आणि मृतदेह नदीत फेकला. हे पाहून मयत महिलेची दोन्ही मुले रडू लागली. आरोपीने बिंग फुटण्याचा भीतीने महिलेच्या दोन्ही मुलांना जीवन्तपणे नदीत फेकले. 

हा सर्व प्रकार रविवारी 21 जुलै रोजी सायंकाळी  उघडकीस आला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. महिला आणि तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम अद्याप सुरु आहे. 

या घटनेनंतर दोन्ही आरोपी मोकाट फिरू लागले अनेक दिवस महिला सापडली नाही म्हणून कुटुंबियांनी  पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कॉल डिटेल्स वरून पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्या दोघांनी आपला गुन्हा काबुल केला. दोघांना पोलिसांनी अटक केली असून महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपींना  फाशी देण्याची मागणी केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit