रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (22:21 IST)

पुण्यातला दुहेरी उड्डाणपुल रविवारपासून प्रवासासाठी खुला होणार

chandrakant patil
पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व वेगवान वाहतूकसाठी नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपुल  रविवार पासून प्रवासासाठी खुला होत  आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून पूल महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला असून पुलाच्या विद्युत व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे उदघाटन विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 
 
या दुमजली पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापालिकेच्या सन 2017-18 अंदाजपत्रकात दुमजली उड्डाणपुलाची संकल्पना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जयपूर येथील दुमजली उड्डाणपुलाच्या धर्तीवर शहरात उभारण्यात आलेला हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल आहे.
 
या उड्डाण पुलामुळे डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35  ते 40 हजार वाहने जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे.