शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (14:29 IST)

धक्कादायक !पुण्यात वाहतूक पोलिसाला कारचालकाने 800 मीटर फरफटत नेले

पूर्वीच्या थकलेले वाहतुक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घालून त्याला 700 ते 800 मीटर फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी प्रशांत श्रीधर कांतावर वय 43, रा. कन्हैया कॉम्प्लेक्स, महंमदवाडी, हडपसर याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय 43) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (गु. र. नं. 253/21) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड व साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनीफाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार दरम्यान घडला.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु
यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय व त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते .त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा 400 रुपयांचा दंड आहे.तो भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवित “एक भी पोलीसवाला ढंग का नही है, पैसा कमाने के लिए खडे हो क्या”असे बोलत दंडाची रक्कम न भरता त्यांनी जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातली.
 
अंगावर गाडी येत असल्याचे पाहून त्यांनी बॉनेटवर धरले.ते गाडीवर लटकत आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यांनी हवालदार यांना 700 ते 800 मीटर अंतरावर घेऊन गेला.यामध्ये जायभाय यांच्या उजवे हाताचे कोपरास व बोटाला दुखापत झाली आहे.पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.