मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2023 (22:15 IST)

अजब चोरी : पादत्राणांचे ५५ जोड लांबविल्याचा प्रकार उघड,तिघांना अटक

arrest
पुणे : पुण्यातल्या खडकी भागात एका पादत्राण विक्रेत्याच्या गोदामातून चोरट्यांनी पादत्राणांचे ५५ जोड लांबविल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
 
याप्रकरणी सागर विलास चांदणे ( वय ३४), आकाश रमेश कपूर (वय ३३), अरबाज महंमद शेख (वय ३५, तिघे रा. खडकी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत हरेश आहुजा (रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आहुजा यांचे खडकी बाजार परिसरात पादत्राणांचे दुकान आहे. आहुजा यांचे गोदाम या परिसरात आहे. चांदणे, कपूर, शेख यांनी गोदामाचा दरवाजा उचकटला. गोदामातील बूट अणि चपलांचे ५५ जाेड लांबविले. आहुजा यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित चोरट्यांचे दिसून आले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढून तिघांना अटक केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor