सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (08:32 IST)

पुणेचांदणी चौकातील पूल २ ऑक्टोबरच्यापहाटे होणार जमीनदोस्त

dhule
वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या चांदणी चौकातील  पुलाला पाडण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून २ ऑक्टोबरच्या पहाटे २ वाजता हा पूल तुकड्यांमध्ये पाडला जाणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे. केवळ ५ सेकंदांमध्ये हा पूल पाडण्यात येणार आहे.
 
या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी संबंधित यंत्रणांची बैठक झाली. त्यात जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नियोजनाबाबत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याबाबत देशमुख म्हणाले, “हा पूल पाडण्यापूर्वी येथील सर्व सेवा वाहिन्या स्तलांथरीत करण्यात आल्या आहेत. तसेच पूल पाडल्यानंतर तयार होणाऱ्या वाढीव लेनसाठी सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी संबंधित जमीन मालक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

हा अपवाद वगळता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुचविलेली सर्व जमीन ताब्यात आली आहे. हा पूल पाडण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार आहे. पूल पाडण्यासाठी शनिवार हा कमी वाहतुकीचा दिवस निवडण्यात आला आहे. तसेच रात्री वाहतूक तुलनेने कमी असल्याने रात्री वेळ योग्य असल्याचे संबंधित यंत्रणांचे म्हणणे होते. त्यानुसार ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या काळात वाहतूक पोलिस तसेच पुणे व पिंपरीचे पोलिस उपस्थित राहतील.”