बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (17:56 IST)

बदलापूरच्या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने नोंद घेत संवेदनशील भूमिका घ्यावी- शरद पवार

बदलापुरात दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीने या प्रकरणाच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारले होते. मात्र बंद ला उच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. 

बदलापूरच्या प्रकरणाच्या निषेधात विरोधी पक्षाने ठीक ठिकाणी मूक आंदोलन केले असून पुण्यात भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी मूक आंदोलन केले आहे. हे आंदोलन पुण्यातील रेल्वे स्थानकाच्या परिसरात केले आहे. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, एक हादरवून टाकणारा मनाला अस्वस्थ करणारा प्रसंग बदलापुरात घडला आहे. या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. बदलापुरातील चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राचे नाव धुमिल झाले आहे.

महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे. त्याची जण आजच्या राजकर्त्यांनी नाही. अलीकडेच बदलापुरातच नव्हे तर देशातील आणखी काही थाईकानी देखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहे. हे दुर्देव आहे. 

सरकारने या स्थितीचे गांभार्य पाहता संवेदनशील भूमिका सरकारने घ्यावी असे माझे मत आहे. राज्याचे काही लोक म्हणतात की, या प्रकरणात विरोधक राजकारण आणत आहे. महिलांवर मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कोणी आवाज उठवला की त्याला राजकारण करत असल्याचे म्हणायचे. या वरून राज्य सरकार किती संवेदनशील आहे.हे दिसून येते.राज्य सरकारने यावर लक्ष द्यावे असं म्हणत त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर घणाघात टीका केली. 
 Edited By - Priya Dixit