शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:24 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, फडणवीस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील पुतळ्याचं अनावरण होईल

uday samant
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते  सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University Pune) साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Statue) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.