गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (15:38 IST)

पत्नी नांदायला येत नाही ,म्हणून पती विजेच्या टॉवरवर चढला

पुण्यातून एक धक्कादायक बातमी येत आहे. पत्नी घरी नांदायला येत नाही म्हणून पती विजेच्या टॉवर  वर चढून बसला.वेळीच पोलिसांनी येऊन त्याला समजावून खाली उतरवले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणाऱ्या केशव काळे नावाच्या 23 वर्षाच्या तरुणाचे लग्न पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील एकाच तरुणीशी झाले. दोघांचा प्रेम विवाह होता. चार महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले. केशव हा मूळ अहमद नगरच्या संगमनेरच्या आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यांच्या दोघात या कारणावरून भांडण होत होती. अखेर तो आपल्या पत्नीला तिच्या माहेरी एप्रिल मध्ये सोडून आला. नंतर त्यांच्या काहीच संभाषण झाले नाही. अखेर तो 19मे रोजी आपल्या कुटुंबियांसह बायकोच्या माहेरी तिला घ्यायला गेला आणि तिला समजावले. तिने येणास नकार दिला. हे बघून रागाच्या भरात येऊन तो माझी पत्नी माझ्यासोबत नांदायला येत नाही.आणि ती येणार नसेल तर मी आत्महत्या करेन निर्णय घेतं तो असा विचार करून गुरुवारी विजेच्या टॉवर  वर चढला. त्याला असं बघून कुटूंबीय घाबरले आणि त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्याला समजावले आणि आम्ही तुझ्या बायकोला समजावून तुमच्यात पुन्हा मैत्री करून देतो असे सांगितले नंतर तो खाली उतरला. आणि कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. एवढे घडून देखील त्याच्या बायकोने येणास नकार दिला.