सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (23:09 IST)

म्हणून मोदींच्या दौऱ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत

पंतप्रधान मोदी  उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र मोदींच्या या दौऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार नाहीत. राज्य सरकारच्या वतीने अजित पवार  आणि सुभाष देसाई हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.  काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना जास्त प्रवास करता येत नसल्याने मुख्यमंत्री उपस्थित नसल्याचे सागण्यात आले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याचा दौऱ्यामध्ये पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही सोहळाही पडणारा आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका , मेट्रो स्थानक परिसरात . एसपीजी आणि पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा असणार महापालिकेत बंदोबस्त असणार आहे. या कार्यक्रमासाठी पास असेल त्या व्यक्तीलाच महापालिकेत सोडलं जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.