मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (15:47 IST)

फेसबुक लाइव्ह करत वेटरने उडी मारून केली आत्महत्या

Waiter commits suicide by jumping while doing Facebook live फेसबुक लाइव्ह करत वेटरने उडी मारून केली आत्महत्या  Maharashtra News Pune Marathi News  In Webdunia Marathi
पुण्यातील मुंढवा परिसरातील हॉटेल पेंटहाऊसच्या तेराव्या मजल्यावरुन फेसबुक लाइव्ह करीत एका वेटरने उडी मारून आत्महत्या केली आहे.अरविंदसिंह राठोड वय २६, रा. सनेती, उत्तराखंड असे आत्महत्या केलेल्या वेटरचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदसिंह राठोड हा मूळचा उत्तराखंडचा राहणारा असून महिन्याभरापूर्वीच मुंढवा येथील हॉटेल पेंट हाऊसमध्ये कामाला आला होता. मात्र महिनाभराच्या कालावधीत त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्यातून बुधवारी रात्रीच्या सुमारास अरविंदसिंह राठोड हा हॉटेलच्या टेरेसवर १३ व्या मजल्यावर गेल्यावर फेसबुक लाइव्ह केले.
मी आत्महत्या करणार असून हॉटेलमधील काही व्यक्तींनी माझं वाईट केले आहे. फसवून माझ्याकडून काही काम करुन घेतले आहे, असं तो म्हणत होता. हे पाहून त्याला अनेकांनी फोन केले. त्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही क्षणातच खाली उडी घेतली.