मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (11:35 IST)

राखीच्या सणाला हे 9 उपाय केल्याने दारिद्र्य कमी होत, जाणून घेऊ या काय आहे हे..

रक्षा बंधनाचा सण श्रावणातील पौर्णिमेला साजरा केला जातो. बरेचशे लोक या दिवशी राखी बांधण्याच्या व्यतिरिक्त घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी काही सोपे उपाय करतात. चला तर मग जाणून घेऊ या काय आहेत ते 9 उपाय.
 
1.  रक्षा बंधनाचा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो पौर्णिमेचे देव चंद्रदेव आहे. या तिथीला चंद्रदेवाची पूजा केल्याने माणसाचे सर्वत्र मान होते. त्याचा सर्वत्र अधिकार गाजतो. ही एक सौम्य तिथी आहे.
2. यंदाच्या वर्षी रक्षाबंधन सोमवारी येत आहे. आणि सोमवारचे देव शिव आणि चंद्रमा दोन्ही आहेत. या दोघांची पूजा केल्याने घरात शांती आणि समृद्धीचा वास होतो.
3. यंदाच्या रक्षाबंधनाला सोमवार येत असून हा एक दुर्मिळ संयोग आहे. या दिवशी उपवास केल्याने रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचे फायदे कित्येक पटीने मिळतात.
4. असे म्हणतात की रक्षाबंधनच्या दिवशी मारुतीला राखी बांधल्याने ते भाऊ बहिणीतील आपसातले राग दुरावा दूर करून आपसात प्रेम वाढवतात.
5. जर का आपणास असे वाटत असेल की माझ्या भावाला कोणाची तरी वाईट दृष्ट लागलेली आहे तर आपण या दिवशी तुरटीला आपल्या भावावरून 7 वेळा उतरवून एकाद्या चौरस्त्यावर किंवा चुलीच्या आगेत टाकावं. असे केल्यास लागलेली वाईट दृष्ट दूर होईल.
6. असे ही म्हणतात की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने भाऊ-बहिणी मधील प्रेम वाढत.
7. या दिवशी बहिणीला सर्व प्रकारे आनंदी ठेवून आणि तिला तिची आवडती भेटवस्तू दिल्याने भावाच्या आयुष्यातून गेलेला आनंद परत मिळतो.
8. दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्या बहिणीच्या हातून गुलाबी कापड्यात अक्षता, सुपारी आणि 1 रुपयाच नाणं घ्या. नंतर आपल्या बहिणीला कापड आणि मिठाई भेटवस्तू आणि पेशे द्या आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. दिलेल्या गुलाबी कापड्यातील वस्तूंना बांधून योग्य जागी ठेवल्याने घरातील दारिद्र्य दूर होईल.
9. एके दिवशी एकाशना(एक वेळेस जेवण करणे) केल्यावर राखीच्या दिवशी शास्त्रोत्तर पद्धतीने राखी बांधतात. त्याच्यासह ते पितृ -तरपण आणि ऋषी -पूजा किंवा ऋषी तरपण देखील करतात. असे केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळतो ज्यामुळे जीवनातील सर्व संकटे नाहीसे होतात.