रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2020 (12:46 IST)

रामनवमी: श्रीरामाचे 10 मंत्र, महत्त्वासह अर्थ

(1) 'राम' 
हे मंत्र आपल्यात परिपूर्ण आहे अर्थात शूची-अशुचि अवस्थेत देखील जप करता येतं. याला तारक मंत्र म्हणतात.
 
(2) 'रां रामाय नम:' 
सकाम जपला जाणार मंत्र राज्य, लक्ष्मी पुत्र, आरोग्य आणि विपत्ती नाशासाठी प्रसिद्ध आहे.
 
(3) 'ॐ रामचंद्राय नम:' 
क्लेश दूर करण्यासाठी प्रभावी मंत्र आहे.
 
(4) 'ॐ रामभद्राय नम:' 
कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
 
(5) 'ॐ जानकी वल्लभाय स्वाहा' 
प्रभु कृपा प्राप्त करण्यासाठी व मनोकामना पूर्तीसाठी जपावं.
 
(6) 'ॐ नमो भगवते रामचंद्राय' 
विपत्ती-आपत्ती निवारणासाठी प्रभावी आहे. 
 
(7) 'श्रीराम जय राम, जय-जय राम' 
हे अद्भुत प्रभावी मंत्र आहे. 
 
(8) श्रीराम गायत्री मंत्र 'ॐ दशरथाय नम: विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्ना राम: प्रचोदयात्।' 
हे मंत्र समस्त संकट दूर करणारं आणि ऋद्धि-सिद्धि प्रदान करणारे आहे. 
 
(9) 'ॐ नम: शिवाय', 'ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:।' 
हे मंत्र एकाच वेळ अनेक कार्य करतं. या मंत्राचा जप स्त्रिया देखील करु शकतात. कारण तसे तर हनुमानाचे मंत्र उग्र असतात परंतू महादेव आणि राम मंत्रासोबत जप 
 
केल्याने त्यांची उग्रता नष्ट होते. 
 
(10) 'ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:' 
शत्रूवर विजय, कोर्ट- कचेरी इतर समस्यांपासून मुक्तीसाठी प्रभावी आहे.