अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिलेली नाही, असे उत्तर एसीबीने ईडीला दिले आहे. त्यामुळे पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडीने एसीबीकडून कागदपत्र मागवली होती. यावेळी उत्तर देताना अजित पवार यांना क्लीन चिट दिलेली नाही, असे एसीबीने स्पष्ट केले.
याप्रकरणी काही शासकीय अधिकाऱ्यांना एसीबीने अटकही केली होती. मात्र पवारांची यामध्ये भूमिका काय आहेत, हे तपासण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून ईडीने कागदपत्रं मागवली होती. त्यामुळे आता कागदपत्र मागवल्यानंतर ईडीकडून अजित पवारांची चौकशी केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.