testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आई-वडिलांच्या भांडणाला वैतागून युवकाची आत्महत्या

सोलापूर| Last Modified गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (14:13 IST)
आई-वडिलांच्या भांडणाला वैतागून सतरा वर्षात्या युवकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत केली.

अजय मार्कड म्हेत्रे (रा. शेटेवस्ती) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरी घडली. अजय हा आई-वडिलांच सततच्या भांडणामुळे वैतागला होता. या भांडणाचा राग मनात धरून त्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात तो शंभर टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी 1.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.


यावर अधिक वाचा :