testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आगीत होरपळून माय लेकराचा मृत्यू

fire
Last Modified मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:34 IST)
शाँटसर्कीटमुळे आग लागून झोपल्याजागी माय लेकराचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) येथे घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घडली.

उमरगा येथील किराणा दुकानदार रामदास बिराजदार यांच्या घराचे बांधकाम सुरू होते, दररोज प्रमाणे ते दि २१ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान बांधकामाला पाणी मारण्यासाठी उठले. आचानक पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घरातून धुर व फटाक्याचा आवाज येताच शेजाऱ्यांच्या मदतीने विद्युत पुरवठा बंद करून पाणी मारुन आग विझविण्यात आली. या आगीत दुर्दैवाने पत्नी शुभांगी बिराजदार (वय 28) व मुलगा प्रेम (वय 3) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
घराचे बांधकाम सुरू आसलेल्या दुकानचे व इतर सर्व साहित्य एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. विद्युत प्रवाहामुळेच आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक आर. डी. निलंगे पो. काँ. सुधिर शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला. उप जिल्हा रुग्णालय निलंगा येथे शवविच्छेदनानंतर आंतविधी करण्यात आला. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. घटनेमुळे संपुर्ण गावात शोककळा पसरली होती.


यावर अधिक वाचा :