कोणत्याही कायद्याचा गैरवापर होऊ नये : पवार
अँट्रॉसिटी हा संसदेने पारित केलेला कायदा आहे, त्यात दुरूस्ती करता येणार नाही. मात्र या कायद्याचा कुणीही गैरवापर करु नये, ही आपली भूमिका असून कोणत्याही कायद्याचा गैरवापर होत असेल तर शासकीय यंत्रणेने त्याचा विचार करायला हवा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मांडले.
मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अँट्रॉसिटी कायद्याचा दलितांनी गैरवापर केल्याचे उदाहरण माझ्यासमोर तरी आलेले नाही. याउलट दोन सवर्णंच्या भांडणात दलित व्यक्तीचा वापर करुन आपल्या विरोधी गटाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, असेच चित्र दिसते, असे पवार यांनी यावेळी सांगितले.