testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ताडोबाची ‘माया’ आता टपाल तिकिटावर

tiger
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीचं चित्र आता टपाल तिकिटावर झळकणार आहे. ‘माया’ सध्या ताडोबात येणार्‍या पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. याच मायाचे एक मायेने भरलेले छायाचित्र चंद्रपुरातील हौशी छायाचित्रकार अमोल बैस यांनी टिपले आणि हेच चित्र आता टपाल तिकिटाचे रूप घेणार आहे. या तिकिटाच्या निमित्ताने व्याघ्र संरक्षणासंदर्भातील जनजागृतीला नवा आयाम मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले आहे. पट्टेदार वाघांची भूमी म्हणून ताडोबा ओळखले जाते. पट्टेदार वाघाचं हमखास दर्शन येथे होत असल्याने पर्यटकांसोबतच हौशी छायाचित्रकारही मोठय़ा संख्येने येथे हजेरी लावतात.

चंद्रपूरचे हौशी छायाचित्रकार अमोल बैस यांनाही ङ्खोटोग्राङ्खीची भारी आवड. त्यांनी एक जानेवारी 2016 रोजी ताडोबातील पांढरपौनी तलावाजवळ माया वाघिणीचं तिच्या बछडय़ासह छायाचित्र काढले. त्यानंतर अमोलनं हे छायाचित्र फेसबुकवर टाकले आणि पाहाता पाहाता त्याला अडीच लाखांपेक्षा जास्त लाईक्स, 25 हजारांवर शेअर्स आणि 14 हजार प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर हे छायाचित्र इंग्लंडच्या ‘डेली मिरर’ वृत्तपत्रानं मुख्य पानावर प्रकाशित केलं. व्याघ्र दिनी ‘माया’ टपाल तिकिटावर झळकणार. आजवर अनेक छायाचित्रकारांनी ताडोबातील वाघांची छायाचित्रे टिपली आहेत. पण अमोल बैस यांनी जी माया टिपली, ती इतरांना टिपता आलेली नाही.

वाघासारख्या हिंस्त्र पशुचे वात्सल्याने ओतप्रोत हे चित्र त्यामुळे फेसबुकवर तुफान लोकप्रिय ठरले. या फोटोच्या लोकप्रियतेची माहिती मिळाल्यावर चंद्रपूरचेच असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे छायाचित्र टपाल तिकिटावर यावे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांनी अनेक देशी-विदेशी पाहुण्यांनाही हेच छायाचित्र भेट म्हणून दिले आहे. या माध्यमातून वन्यजीव आणि जंगल या दोन्ही घटकांची माहिती जनतेपर्यंत जावी आणि संवर्धनासाठी मदत व्हावी, यासाठी टपाल तिकिटावर 29जुलै म्हणजेच व्याघ्र दिनी तिचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर छळकणार आहे.


यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...

फेसबुकने मानले, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गडबडीमुळे 1.4 कोटी ...

national news
फेसबुकने गुरुवारी सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीनं दिलेल्या ...

लॅपटॉप, अन्य उपकरण शोधणे झाले सोपे

national news
डिजीटेक कंपनीने ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे नवं गॅजेट लॉन्च केलं आहे. ५९५ रुपयांच्या ...

अॅमेझॉनला ५ वर्ष पूर्ण, ग्राहकांसाठी ऑफर

national news
अॅमेझॉन ई-कॉमर्स कंपनी भारतातली पाचवी वर्षपूर्ती साजरी करत आहे. त्यानिमित्ताने ...