शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 13 ऑगस्ट 2015 (11:18 IST)

दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा

दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केली. १२ वर्षांवरील मुले या क्रीडा प्रकारात भाग घेऊ शकतील, मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी गोविंदा पथकांवर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तावडे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने २०१२मध्ये जाहीर केलेल्या क्रीडा धोरणात गोविंदाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबतची तरतूद केलेली होती. त्या अनुषंगाने विधिमंडळाच्या अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी मागणी केल्यामुळे आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार गोविंदा साहसी क्रीडा प्रकार घोषित करण्यात आला आहे.